मळभ मराठी कविता | Malabh Marathi Poem
आसवांच्या मागे
दिसे स्वप्न भोळे...
पापणी मिटे ती
वाचताच डोळे...

वाहताना वाटे
काही उरले ना पाठी...
रिती भावना ती
कोरड्याशा ओठी...

सरता मळभ
लकाके ती कांती...
जुमानी न वार्‍या
लाभता मना शांती...
        — पूनम जगताप
©Poonam Jagtap 

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने