सोबती मराठी कविता | Comrade Marathi Poem

सहवास तुझा हर्षदायी 
खुलून येई प्रत्येक क्षण... 
सोबत नसला तू तरीही 
गुंतून राही तुझ्यात मन... 

ही जन्माची साथ हवीशी 
जिव्हाळ्याचा बंध गोड... 
प्रीत रुजुनी फुललेली 
तरी जीवाला लागे ओढ... 

श्वासांची सोबत आपुल्या 
प्रवासात घट्ट होत जावी... 
पावलांची अशीच सोबत 
क्षितिजापर्यंत चालत यावी...
                — पूनम जगताप
©Poonam Jagtap 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने